Mumbai Local Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

Central Railway And Harbour Railway Megablock: मध्य रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक वाचा...

Priya More

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी तुम्ही लोकलने प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहा. नाही तर तुम्हाला प्रवासादरम्यान तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. कारण रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० वाजल्यापासून ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावरील ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावरून धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मात्र या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याहून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड, माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते चुनाभट्टी/वांद्रे या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११. १० वाजल्यापासून ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध काही तांत्रिक आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच हार्बर मार्गावर सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकलसेवा सुरू राहतील. तर सीएसएमटीवरून याच वेळेत वांद्रे / गोरेगावसाठी सुटणाऱ्या लोकलसेवा देखील सुरूच राहतील. तर, पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत मुंबई सीएसएमटीसह गोरेगाव/वांद्रे इथून १०.४५ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत सीएसएमटीच्या दिशेनं सुटणाऱ्या लोकलसेवा बंद राहतील.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक -

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री ब्लॉक असणार आहे. सांताक्रूझ आणि गोरेगाव या स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर शनिवारी मध्य रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी मध्य रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ३.३० दरम्यान ब्लॉक घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT