Mumbai Local Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच पडा घराबाहेर

Central And Harbour Railway Megablock: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे- दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Priya More

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या १४ जुलै रोजी म्हणजे रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे- दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच पडावे नाही तर त्यांना गर्दीचा सामाना करावा लागू शकतो. या मेगाब्लॉकमुळे मेल- एक्स्प्रेस गाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

मध्य रेल्वे मार्गावर सकाळी १०.५० वाजल्यापासून ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी येथून डाऊन जलद/अप जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून अप जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. त्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील. तर मुंबईकडे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११. १० वाजल्यापासून ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तर सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल सेवा धावणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवास मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करू शकतात.

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक -

पश्चिम रेल्वे मार्गावर विवारी रात्री १२.१५ वाजल्यापासून ते पहाटे ४.१५ वाजेपर्यत मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप- डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल सेवा सांताक्रूझ ते चर्चगेट रेल्वे स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नाशिकनंतर नागपूर हादरले! महिलेचं जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न; नकार देताच विनयभंग अन् मारहाण, ६ जणांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

SCROLL FOR NEXT