Mumbai Local Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा विशेष ब्लॉक, लोकल वाहतुकीत अनेक बदल; वाचा वेळापत्रक

Central Railway Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर शनिवार आणि रविवारी दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या विशेष ब्लॉकमुळे लोकलसेवेवर परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Priya More

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या ८ मार्च म्हणजे शनिवार आणि ९ मार्च म्हणजे रविवार रोजी कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या (टप्पा-१) लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलसेवेवर परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये लोकल प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर पहिला ब्लॉक ८ मार्चला म्हणजे शनिवारी सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर असणार आहे. तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक ९ मार्च म्हणजे रविवार सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत आणि दुपारी ४ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.२५ वाजेपर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर घेण्यात येणार आहे.

कसारा येथून शनिवार आणि रविवार सकाळी ११.१० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-१६) लोकल ट्रेन आसनगाव येथून सुटेल. कसारा येथून रविवारी ४.१६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-२६) लोकल कल्याण येथून सुटेल. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT