Mumbai Local Mega Block Sunday 13 August 2023: Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहाच...

Mumbai Local Mega Block Sunday: उद्या म्हणजेच रविवारी (१३ ऑगस्ट) लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

Satish Daud

Mumbai Local Mega Block Sunday 13 August 2023: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रविवारी (१३ ऑगस्ट) लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे रविवारी तुम्ही सुद्धा घराबाहेर पडणार असाल, तर रेल्वेचं वेळापत्रक जाणून घेणे गरजेचे आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकीकडे मुंबईतील वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे रविवारी जारी करण्यात आलेला मेगाब्लॉक यामुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

रविवारी हार्बर मार्ग मेगाब्लॉक

मानखुर्द-नेरुळ अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११:१५ ते दुपारी ४:१५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान मानखुर्द ते नेरुळ स्थानकांदरम्यानची सर्व लोकल वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी सकाळी १० ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावरून प्रवास करू शकतात.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक जाहीर

मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंडपुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

उद्या पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ब्लॉकवेळेत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. विलेपार्ले व राम मंदिर स्थानकात लोकल उपलब्ध राहणार नाहीत. बोरिवली ते गोरेगावदरम्यान काही लोकलफेऱ्या रद्द असणार आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT