Mumbai Local Train Saam Tv Digital
मुंबई/पुणे

Mega Block: मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

उद्या मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. रविवार दि. २४.४.२०२२ रोजी हा मेगा ब्लॉक आहे.

सुमित सावंत

मुंबई: उद्या मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. रविवार दि. २४.४.२०२२ रोजी हा मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागमध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवणार असल्याचे पत्रक मध्य रेल्वेने काढले आहे.

मेगा ब्लॉक खालील मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी तथा ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शन मध्ये विशेष गाड्या चालविण्यात येतील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील अशी माहिती पत्रकातून देण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: एमआयएमच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूर हादरलं!

Panvel Fort : पनवेलजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा, सह्याद्रीत लपलाय १८व्या शतकातील भव्य इतिहास

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये ढगफुटीचा तडाखा; धबधब्यावर आलेले पाच पर्यटक पुरात वाहून गेले, एकाचा मृत्यू

Gurupournima 2026 : गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? काय आहे महत्त्व?

CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एंट्री; 100% पेट्रोलसाठी सोशल मीडियावर मोहीम

SCROLL FOR NEXT