Mumbai Local Train News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कर्जतजवळ पेंटाग्राफ तुटला; प्रवाशांचे हाल

Central Railway Disruption: पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

Priya More

मयूरेश कडव, कर्जत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत- भिवपूरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दीड तासानंतर कर्जत-सीएसएमटी लोकल वाहतूक सुरू झाली आहे पण लोकल उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

कर्जत रेल्वे स्टेशनमध्ये लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे दीड तासांपासून मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक बंद झाली होती. मध्य रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. आता ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. थोड्या वेळापूर्वीच कर्जतहून मुंबईच्या दिशेने लोकल रवाना झाली आहे.

सकाळच्या सुमारास कर्जतजवळ लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. त्याचा फटका कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला. कर्जत ते वांगणीपर्यंत लोकलसेवा नसल्यामुळे प्रवासी दीड तास स्टेशनवरच ताटकळत बसले होते. बदलापूरपासून सीएसएमटीकडे लोकल वाहतूक सुरू असल्यामुळे तिथल्या प्रवाशांना फारसा फटका बसला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊट...

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT