Mumbai Local  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local News : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; नेरळ स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनात बिघाड

मालवाहू गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

साम ब्युरो

Mumbai Railway News : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. नेरळ रेल्वे स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे. मागील अर्ध्या तासापासून कर्जत-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीसाठी रेल्वेचे कर्मचारी नेरळ रेल्वे स्थानकात आल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील उपनगरीय ट्रेन विलंबाने धावत आहेत. त्याचा फटका ट्रेनने रोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला बसत आहे. उपनगरीय गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी आहे. यात आता आणखी भर पडली आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Maharashtra News)

मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकात सकाळी मालवाहू गाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे मालवाहू गाडी बराच वेळ नेरळ रेल्वे स्थानकात थांबली होती. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. कर्जतकडे आणि कर्जतहून मुंबईला येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊन प्रवाशांचे हाल झाले.  (Breaking Marathi News)

काही वेळाने रेल्वेचे कर्मचारी दुरुस्तीसाठी नेरळ स्थानकात पोहोचले. दुसरीकडे, मुंबईकडे जाणाऱ्या उपनगरी गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा बराच वेळ खोळंबा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT