Mumbai: लोकल ट्रेनप्रमाणे आता बेस्ट बसच्या प्रवासासाठीही दोन्ही डोस आवश्यक... Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: लोकल ट्रेनप्रमाणे आता बेस्ट बसच्या प्रवासासाठीही दोन्ही डोस आवश्यक...

लवकरच या आदेशाची प्रत मिळताच त्यांची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आता लसीचे दोन्ही डोस नसलेल्यांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशासह राज्यात कोरोनाची (Corona Virus) रुग्णसंख्या घटत असली तरी कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) जगाची पुन्हा चिंता वाढवली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचे निर्बंध कठोर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे मुंबईच्या लोकल ट्रेनने (Mumbai Local Train) प्रवास करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आता मुंबईच्या बेस्ट बसमधून (Mumbai Best Bus) प्रवास करण्यासाठीही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. (Mumbai: Like local train, now both doses are required for the best bus journey)

हे देखील पहा -

राज्य शासनाने या संदर्भातील नियमावली जारी केली आहे. पण बेस्ट कर्मचाऱ्यांना अद्याप या संदर्भातील अध्यादेशाची प्रत पोहचली नसल्याने सध्या तरी युनिव्हर्सल पास (Universal Pass) न पाहताच प्रवास करू दिला जातोय, मात्र लवकरच या आदेशाची प्रत मिळताच त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आता लसीचे दोन्ही डोस नसलेल्यांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐनदिवाळीत राजकीय वादाचा धमाका! माजी आमदारांच्या प्रवेशांवरून भाजपात फुटला वादाचा बॉम्ब; निष्ठावंतांची नाराजी

Maharashtra Live News Update : विरारमध्ये अग्नीतांडव! फर्निचर दुकानं जळून खाक

Ration Shop : दिवाळी सणात निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य वाटप; आळ्या, किडे असलेले धान्य मिळाल्याने नागरिकांचा संताप

Spruha Joshi In Saree: खूपच सुंदर दिसतेस स्पृहा जोशी, सौंदर्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT