Mumbai News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Latest News : मुंबईवर पुन्हा अतिरेक्यांची नजर, तीन अतिरेकी घुसल्याची पोलिसांना फोनवरून माहिती

Mumbai News: तीन अतिरेकी मुंबईत घुसले, पोलिसांना फोनवरून माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> सचिन गाड

Mumbai News: मुंबई पोलिसांना मुंबईत अतिरेकी घुसल्याच्या फोन आलेला आहे. दुबईहून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आले, अशी माहिती फोनवरून पोलिसांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आला होता. मुंबईत आलेल्या अतिरेक्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा हा राजा ठोंगे या व्यक्तीने केला आहे. (Latest Marathi News)

राजा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या तिघांचाही बेकायदेशीर व्यवसाय आहे. यापैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या आधारावर पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांना अतिरेकी संबंधित माहिती देणारे राजा ठोंगे हे पुण्याचे असून याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्यांना पुन्हा कॉल केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी

याआधी पुण्यातील कोरेगाव पार्कात(Koregaon Park) बॉम्ब ठेवण्यात आल्याचा खोटा कॉल आल्याची घटना समोर आली होती. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा खोटा कॉल आला होता. या खोट्या कॉलमुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून सुरू होतंय विक्रम संवत 2083; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

Sakharechi Mal Recipe: गुढी पाडव्यासाठी साखरेची माळ घरी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील भाजप आमदाराची चौकशी होणार, कोर्टानं दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?

Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशीचं निखळ हास्य...

Maharashtra Live News Update: गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा इशारा, काळाबाजार करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई

SCROLL FOR NEXT