Mumbai Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

नवी मुंबईत लिफ्ट कोसळून ४ मजूरांचा मृत्यू, २ जण जखमी

१४ व्या मजल्यावरुन बांधकामाचे साहित्य नेणारी क्रेन कोसळली.

साम टिव्ही ब्युरो

नवी मुंबई: नवी मुंबई(Mumbai) येथील तळोजा फेज २ येथे सिडकोच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन बांधकामाचे साहित्य नेणारी क्रेन कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सिडकोच्या वतीने तळोजा फेज-2 मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत इमारतीचे बांधकाम सुरु असून बी.जी.शिर्के कंपनी मार्फत हे काम सुरू आहे.

या बांधकाम साईटवर बांधकाम साहित्य नेण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन चौदाव्या मजल्यावरून क्रेन ऑपरेटरसह खाली उभ्या असलेल्या मजुरांवर तसेच कारवर कोसळली. त्यामुळे या दुर्घटनेत क्रेन ऑपरेटरसह क्रेनखाली दबून दोन मजुर आणि कार चालक अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन कामगार जखमी झाले आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिडकोतर्फे सदर दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून, दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना कंत्राटदारांकडून प्रत्येकी ७ लाख रुपये तर जखमींच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. हा अपघात (Accident) घडला कसा हे नेमके अजून समोर आलेले नाही. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कंत्राटदार बी.जी. शिर्के यांना सिडकोतर्फे देण्यात आले आहेत. याचबरोबर जखमींवरील उपचाराचा खर्चही कंत्राटदार यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT