RPI Athawale Group Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबईत खळबळ! रिपाई आठवले गटाच्या १५ पदाधिकाऱ्यावर गुन्हा, 'या' ठिकाणी प्लॉट हडपण्याचा प्रयत्न

RPI Athawale Group : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील खासगी प्लॉटवर कथित बेकायदेशीर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नाप्रकरणी रिपाई (आठवले गट) नेते संजय खंडागळे यांच्यासह १० ते १५ जणांविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

RPI Athawale group plot encroachment case Mumbai : अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरात एका खासगी प्लॉटवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अंधेरी तालुका अध्यक्ष आणि टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी प्लॉट मालकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीत संजय खंडागळे यांनी त्यांचे सहकारी छोटा कन्ना, मोठा कन्ना आणि इतर १० ते १५ महिला व पुरुषांसह संबंधित प्लॉटवर जाऊन बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.

दरम्यान, संजय खंडागळे आणि त्यांचा गट अंधेरी, मरोळ तसेच गोरेगावमधील आरे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून घरे आणि जागांवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिस त्याबाबत अधिक तपास करत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय खंडागळे यांच्यासह छोटा कन्ना आणि मोठा कन्ना यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत. या दाव्यांची अधिकृत नोंद आणि न्यायालयीन स्थितीची पडताळणी सध्या सुरू आहे.

या प्रकरणाच्या अनुषंगाने, अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास किंवा घर, प्लॉट अथवा जागेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला असल्यास नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पवई पोलिसांनी केले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT