Mumbai Mhada Lottery Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांना हक्काचं घर मिळणार, वरळीत म्हाडा बांधणार २ गगनचुंबी टॉवर्स; एक ८५ तर दुसरा ५८

Luxury MHADA Flats Coming to South Mumbai: दक्षिण मुंबईत म्हाडा बांधणार २ गगनचुंबी टॉवर्स. ५८ आणि ८५ मजली दोन टॉवर्स उभारण्याची योजना अंतिम टप्प्यात.

Bhagyashree Kamble

  • दक्षिण मुंबईतील वरळीत २ गगनचुंबी टॉवर्स

  • म्हाडाकडून सामान्यांसाठी खुशखबर

  • ८५ तसेच ५८ मजली २ टॉवर्स म्हाडा उभारणार

मुंबईत स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्या मुंबईतील घरांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. मुंबईतील जमीनींना सोन्याचे मोल मिळाले आहेत. त्यामुळे घर खरेदी करावे की नाही? असा मोठा प्रश्न सामान्यांच्या समोर उभा आहे. सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कायम सज्ज असते. म्हाडाकडून स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. दरम्यान, सामान्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी काळात दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात म्हाडाकडून घरं दिली जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडानं वरळीतील बीडीडी चाळीच्या परिसरात ५८ तसेच ८५ मजली असे २ टॉवर्स उभारण्याची मोठी योजना आखली आहे. या इमारती पूर्ण झाल्यावर लॉटरी प्रक्रियेद्वारे अलिशान घरात राहण्याची संधी सामान्य नागरिकांना मिळेल. या इमारतींमध्ये सामान्यांना पंचतारांकित सुविधा देखील मिळणार आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाकडून नव्या इमारतींचं बांधकाम सुरूये. मिळालेल्या माहितीनुसार, या पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाला स्वत: विकास करण्याची स्वतंत्र भूखंड उपलब्ध होणार आहे. याच जागेवर म्हाडाकडून ५८ आणि ८५ मजली टॉवर्स उभारण्यात येणार आहे. अशी योजना म्हाडाने आखली आहे.

म्हाडाकडून दोन्ही टॉवर्स उभारल्यानंतर, नेहमीप्रमाणे लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करणार आहे. या नवीन इमारतींमध्ये आधुनिक आणि अलिशान सुविधांची सोय देखील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, मशीन आणि औषधं जप्त

Winter Skin Care : हिवाळ्यातील जादुई फेसपॅक, रोज चमकेल त्वचा

Accident: बॅरियरला धडकत कार उड्डाणपूलावरून खाली कोसळली; शबरीमालाला जाणाऱ्या ४ जणांचा जागीच मृत्यू

Lasun Chutney: रोज वरण भात खाऊन कंटाळलात? मग गरमा गरम भाकरीसोबत करा लसणाच्या स्पेशल चटणीचा बेत

खरे 'ही मॅन', ते कायम आठवणीत राहतील; धर्मेंद्र यांच्या निधनानंर सचिन पिळगावकरांची भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT