Mulashi Accident news Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; वाळूने भरलेल्या ट्रकने तिघांना चिरडलं, अपघातानंतर चालक फरार

Mumbai accident news : मुंबईत पुन्हा हिट अँड रनची घटना घडली. वाळूने भरलेल्या ट्रकने तिघांना चिरडल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

मुंबईच्या दहिसरमध्ये हिट अँड रनचा प्रकार

वाळूने भरलेल्या ट्रकने तीन पादचाऱ्यांना चिरडले

जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. मुंबईच्या दहिसर रावलपाडा परिसरात अपघात घडली. दहीसर पूर्व येथील रावलपाडा परिसरात रेती कंपाऊंड परिसरात भरधाव ट्रकने तिघांना चिरडल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. अपघाताची घटना बुधवारी सांयकाळच्या सुमारास ही घटना घडली.

संध्याकाळी सातच्या सुमारास रावळपाडा रेती कंपाउंड परिसरात वाळूने भरलेली ट्रक कंपाउंडमधून बाहेर निघत असताना ट्रक चालकाचा ट्रकवरून नियंत्रण सुटला. त्यानंतर या ट्रकने रस्त्यावर पायी चालत जाणारे तीन जणांना चिराडल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली येऊन तीन जण गंभीर जखमी झाले. या जखमींना जवळचा कांदिवली शताब्दी रुग्णालयमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मोठे गर्दी केली. ट्रक चालकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. तो त्याच परिसरात राहणारा नागरिक असल्यामुळे पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये ताब्यात घेतला आहे. अपघात कशामुळे झाला, या संदर्भात पुढील तपास आरटीओ यांच्या तपासणीनंतर दहिसर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

ठाण्यात कार थेट खड्ड्यात कोसळली

ठाण्यातील पाचपाखाडीमध्ये अपघाताची घटना घडली. कारची टेस्ट ड्राइव्ह करताना ताबा सुटला. त्यानंतर कार थेट ४० फूट खड्ड्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या कारमध्ये एकूण तीन जण होते. या कारमधील जखमींना तातडीने दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! घरात AC, कार रेशन कार्ड रद्द होणार? 70 लाख रेशनधारकांना फटका बसणार

राज्यपाल हरिभाऊ बागडेंची प्रकृती बिघडली, ICU मध्ये उपचार सुरू; उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हॉस्पिटलमध्ये गर्दी

Palghar Tourism : पालघरमध्ये लपलाय एक ऐतिहासिक किल्ला, ट्रेकर्ससाठी खास आकर्षण आहे 'हे' ठिकाण

इराणने दिला आरपारचा इशारा, माघारीस नकार, युद्ध लांबणार

युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन? भर रमझानमध्येच इफ्तार पार्ट्यांवर बंदी

SCROLL FOR NEXT