Mumbai AC Local Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: गुड न्यूज! हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवास होणार गारेगार; २६ जानेवारीपासून एसी लोकल धावणार; वाचा वेळापत्रक

Mumbai AC Local: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने नवी मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गिफ्ट दिले आहे. हार्बर रेल्वे मार्गावर १४ एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास गारेगार होणार आहे.

Priya More

Summary:

  • नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

  • प्रजासत्ताक दिनाला मिळणार नवीन गिफ्ट

  • हार्बर रेल्वे मार्गावर धावणार १४ एसी लोकल

  • प्रवास आणखी आरामदायी आणि गारेगार होणार

हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास लवकरच गारेगार होणार आहे. या रेल्वे मार्गावर एसी लोकल चालवण्याबाबतचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. २६ जानेवारीपासून हार्बर रेल्वे मार्गावर १४ एसी लोकल धावणार आहेत. नवी मुंबईकरांसाठी हे प्रजासत्ताक दिनाचे मोठं गिफ्ट असणार आहे.

२६ जानेवारीपासून हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी/ वडाळा ते पनवेल या मार्गावर १४ एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी आरामदायी आणि गारेगार होईल. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने एसी लोकल चालवण्याबाबत निर्णय घेतला. आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांमध्ये दिवसाला १४ एसी लोकल या मार्गावर धावतील. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर लोकलच्या प्रत्येकी ७ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर १ डिसेंबर २०२१ पासून एसी लोकल सुरू करण्यात आली होती. पण एसी लोकलचे तिकीट आणि पासचे दर जास्त असल्यामुळे या लोकलला प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत होता. तसंच एसी लोकलमुळे सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. या लोकल बंद करून सामान्य लोकल चालवण्यात याव्यात अशा तक्रारी देखील रेल्वे प्रवाशांनी केल्या होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेने एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता एसी लोकल पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू होणार असल्यामुळे नव्या नियोजनानुसार गर्दीच्या वेळेत धावणारी सकाळी ९.०९ वाजताची पनवेल-सीएसएमटी आणि सायंकाळी ५.३० वाजताची वडाळा रोड-पनवेल, रात्री ८ वाजताची सीएसएमटी-पनवेल या तीन सामान्य लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. या लोकलच्या जागी एसी लोकल धावतील. सोमवार ते शनिवार दरम्यान वाशी ते वडाळा रोड, सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते वाशी, वडाळा रोड ते पनवेल या अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी ७ अशा १४ एसी लोकल धावतील. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल फेऱ्या रद्द राहतील. त्याऐवजी सामान्य लोकल फेऱ्या धावतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT