mumbai accident  saam tv
मुंबई/पुणे

Ghatkopar Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात; भरधाव टेम्पोने ५ ते ६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू

Mumbai Ghatkopar Accident update : मुंबईत पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे.भरधाव टेम्पोने ५ ते ६ जणांना चिरडलं आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील बेस्ट अपघाताची घटना ताजी असताना आणखी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. कुर्ल्यानंतर घाटकोपरमध्येही भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात भरधाव टेम्पोने ५ ते ६ पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या कुर्ल्यामध्ये काही दिवसांपूर्वी बेस्ट बस अपघाताची घटना घडली होती. या अपघातात १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. भरधाव बेस्टमुळे काही जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या अपघातानंतर मुंबईत एकच भीती पसरली होती. त्यानंतर मुंबईत आणखी एका अपघाताची घटना घडली आहे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये भीषण अपघात झाला आहे.

मुंबईच्या घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भरधाव टेम्पोन पाच ते सहा पादचाऱ्यांना चिरडलं आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातामधील टेम्पो चालक दारूच्या नशेत होता का, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. या अपघातानंतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.

नेमकं काय घडलं?

घाटकोपरच्या चिराग नगरमध्ये टेम्पो चालक २५ वर्षीय उत्तम बबन खरातचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर त्याने थेट ५-६ पादचाऱ्यांना चिरडलं. या अपघातात ३५ वर्षीय प्रीती पटेल नावाच्या महिलेचा मृत्यू झाला.

तर २३ वर्षीय रेश्मा शेख, २७ वर्षीय मारुफा शेख, ३८ वर्षीय तोफा उजहर शेख, २८ वर्षीय मोहरम अली अब्दूल रहीम शेख हे जखमी झाले आहेत. या नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. त्यांना तात्काळ राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या अपघातानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं आहे. तसेच टेम्पो देखील ताब्यात घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT