Ghatkopar Hoarding Fall: Former Indore Airport Director And His Wife Died in Mumbai Hording Fall Accident Saam TV
मुंबई/पुणे

Ghatkopar Hoarding Accident: कारमध्ये पेट्रोल भरायला गेले अन् जीव गमावून बसले; मुंबईतील दाम्पत्याची हृदयद्रावक कहाणी

Mumbai Hoarding Collapse News: मृतांमध्ये एका दाम्पत्याची कार देखील आढळली. त्यात या दाम्पत्याचा मृतदेह आढळला. कारमध्ये पेट्रोल भरायला गेलेले हे दाम्पत्य जीव गमावून बसले.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग कोसळलेल्या घटनास्थळी पालिकेने बचावकार्य देखील थांबवलं आहे. या मृतांमध्ये एका दाम्पत्याची कार देखील आढळली. त्यात या दाम्पत्याचा मृतदेह आढळला. कारमध्ये पेट्रोल भरायला गेलेले हे दाम्पत्य जीव गमावून बसले. २५० टन होर्डिंगखाली १०० जण अडकले होते. त्यातील १६ जणांचा मृत्यू झाला असून इतर जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

रिपोर्टनुसार, बुधवारी रात्री ६० वर्षीय मनोज चंसोरिया आणि ५९ वर्षीय अनिता यांचा मृतदेह असल्याचे सांगण्यात येत आहे. मनोज हे इंदूर एअरपोर्टचे माजी संचालक होते. मनोज हे निवृत्त झाल्यानंतर पत्नीसोबत जबलपूरला स्थलांतरित झाले होते. यूएसए व्हिसाच्या संबंधित कामासाठी दोघे मुंबईला आले होते.

व्हिजाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोघे जबलपूरसाठी निघाले होते. रस्त्यात पेट्रोल पंप भरण्यासाठी घाटकोपर पंपावर थांबले होते. त्यानंतर जोरदार वादळ आलं. त्यावेळी पेट्रोल पंपाशेजारील होर्डिंग कोसळलं. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने आई-वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाही. त्यानंतर मित्राच्या मदतीने पोलिसांत आई-वडील हरविल्याची तक्रार दिली.

तक्रारीनंतर पोलिसांनी हरवलेल्या दाम्पत्याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचं शेवटचं लोकेशन पेट्रोल पंपाच्या जवळ सापडलं. या घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस सध्या या अनधिकृत होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याच्या मागावर आहेत. त्याच्या विरोधात गु्न्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅट्रिमोनियल साईट्सवर वर्दी दाखवून तरुणींना लुटणारा तोतया PSI गजाआड; २० जणींना लावला लाखोंचा चुना

CM फडणवीसांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास; मुंबईवरून शिर्डीला पोहोचल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Eye Care Tips: डोळे चोळण्यापासून ते अपुरी झोपेपर्यंत, तुमच्या या ८ सवयींमुळे होतंय डोळ्यांचं मोठं नुकसान

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये रक्षक चौकच्या नव्या उड्डाण पुलाच्या उद्घाटनापूर्वीच अपघात

लाखो लिटर इंधन गेलं कुठं? शेतकऱ्यांचा प्रश्न;पालकमंत्र्यांची थेट पेट्रोल पंपावर धाड, मालक फरार

SCROLL FOR NEXT