BMC fitness certificate mandatory for big Ganesh idols in Mumbai saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

BMC New Rules Ganeshotsav : मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. बीएमसी प्रशासनाने णेशमूर्तीसाठी 'योग्यता प्रमाणपत्र' म्हणजेच 'फिटनेस सर्टिफिकेट' अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी

मु्ंबईतील भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर बीएमसी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी मूर्तीच्या वजनाबाबत नवीन नियम लागू केलाय. आता एक टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तीसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच मूर्तीची ऑर्डर दिल्याच्या वेळेपासून ते मूर्ती तयार होऊन मंडळात येईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे.

या नवीन नियमांमुळे मोठ्या आणि वजनदार गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांचा धोका टाळता येणार आहे. जड मूर्तीच्या आगमनादरम्यान अपघातांचा धोका कमी करण्यासाठी त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात एक विशेष कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी डीएमसी झोन २ चे अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत मूर्तीची सुरक्षा, योग्यता प्रमाणपत्रे आणि त्यांच्या वाहतुकीसंदर्भातील नियमांना अंतिम रूप दिले जाण्याची शक्यता आहे.

तर गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांना आणि आगमन मिरवणुकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कडक पावले उचलली आहेत. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनासाठी वापरले जाणारे सर्व प्रमुख रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. रस्ते विभाग आणि सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश मिळालेत.

22 ऑगस्ट रोजी मुंबईतील भुलेश्वर राजा गणेश मंडळाच्या आगमन मिरवणुकीत 22 फुटाची गणेश मूर्ती कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गणेशमूर्तीच्या उंचीबद्दल पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले जात आहेत. यामुळे बीएमसीच्या या नवीन फिटनेस प्रमाणपत्राच्या आणि सुरक्षिततेच्या नियमांमुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा मुंबईकर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

SCROLL FOR NEXT