Mumbai Fire News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire News: मुंबईच्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरातील इमारतीतील घराला आग; अग्निशमन दलाची ५ वाहने घटनास्थळी

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai Fire News: मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या लोखंडवाला परिसरामध्ये एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. लोखंडवाला परिसरातील फोर्थ क्रॉस रोड लेन येथील नेऊला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घराला मोठी आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार,संध्याकाळी साडेसातच्या सुमारास लोखंडवाला फोर्थ क्रॉस रोड लेन मधील नेऊला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घराला मोठी आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या.

यानंतर अग्निशमन जवानांनी इमारतीतील घराला लागलेली आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. आगीची घटना लक्षात येताच घरातील रहिवासी तात्काळ बाहेर पडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दहिसरमध्ये चाळीतील घर कोसळलं; घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही

दरम्यान, मुंबईत आज सकाळापासून पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक दुर्घटना घटना घडत आहेत. पावसामुळे मुंबईतील दहीसर पूर्व भागातही चाळीतील एक घर कोसळण्याची घटना घडली.

मुंबईच्या दहीसर पूर्वेकडील केतकी पाडा भागात शिवशक्ती चाळीतील एक घर कोसळल्याची दुर्घटना घडली. दहिसर पूर्वेकडील सिलेंडर गोडाऊन परिसरातील ही चाळ आहे. या घटनेत सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

SCROLL FOR NEXT