Mumbai Fire Brigade Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया आजपासून सुरू; थेट भरती

अग्निशमन दलात ९१० जागांसाठी भरती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : गेली अनेक वर्षांपासून रखडलेली मुंबई (Mumbai) अग्निशमन दलातील भरती प्रक्रियेला अखेर आजपासून (१३ जानेवारी) सुरुवात होणार आहे. यंदा अग्निशामक पदाच्या तब्बल ९१० जागांसाठीची भरती होणार आहे. दहिसरच्या भावदेवी मैदानात सकाळी ६ वाजल्यापासून सरळसेवा (वॉक इन सिलेक्शन) पद्धतीने होणार आहे. ही भरती प्रक्रिया ४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

महत्वाचे म्हणजे पहिल्यांदाच या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर होणार आहे. भरती प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याकरिता ९ कॅमेरे असणार आहेत. यासर्व चित्रकरणासाठी एक नियंत्रण कक्षही तयार करण्यात आला आहे.

भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी मैदानात सुमारे १६५ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्यात आले आहे. भरतीमध्ये उमेदवारांना धावणे, उंचावरून उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे अशी मैदानी परीक्षा होणार आहे.

याशिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना ६ महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण देऊन त्यानंतर सेवेत रुजू केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT