Mumbai Dam Water Level Today Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 29 टक्के पाणीसाठा, मागच्या वर्षीच्या तुलनेत आहे निम्मा

Mumbai Water Issue: गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या हलक्या पावसाने या सातही धरणातील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली आहे.

Priya More

Mumbai Dam Water Level: यावर्षी मान्सूनचे (Monsoon 2023) उशीरा आगमन झाले. त्यात जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यात म्हणावा तसा पाऊस पडत नाहीये. त्यामुळे चिंता वाढली आहे. सर्वजण चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या (Mumbai Rainfall) सरी कोसळत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात सध्या चांगला पाऊस पडत आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या हलक्या पावसाने या सातही धरणातील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जारी केलेल्या अहवालात असे दिसून आले की, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणाची पाण्याची पातळी एकूण क्षमतेच्या 28.53 टक्के ऐवढी झाली आहे. गेल्या वर्षी 13 जुलैपर्यंत तलावाची पातळी 56.07 टक्क्यांवर पोहोचली होती. यावर्षीचा धरणातील पाणीसाठा पाहिला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा पाणीसाठी निम्मा आहे.

मान्सूनचे उशीरा आगमन त्यात चांगला पाऊस पडत नसल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली दिसत नाहीये. यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून दाखल व्हायला विलंब झाला. मागच्यावर्षी मुंबई आणि उपनगरामध्ये 11 जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. पण यावर्षी मान्सूनला दोन आठवडे उशीर झाला. मुंबई आणि उपनगरामध्ये 25 जूनपासून मान्सूनला सुरुवात झाली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला. पण आता पावसाचा जोर कमी झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सांगितले की, 'या धरणांमध्ये सध्या जो पाणीसाठा आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त ५० टक्के इतकाच आहे. या महिना अखेरपर्यंत शहरात १० टक्के पाणीकपात सुरू राहणार आहे. या महिना अखेरपर्यंत पाऊस आणि धरणांमधील पाणीसाठा पाहून आम्ही पाणीकपात ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेऊ.' दरम्यान, मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT