Mumbai Mankhurd Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Mumbai Mankhurd: मुंबईच्या मानखुर्दमध्ये दहीहंडी तयारीदरम्यान गोविंदाचा मृत्यू झाला. मृत गोविंदाचं नाव जगमोहन शिवकिरण चौधरी (वय ३२) आहे. दोरी बांधताना तोल गेल्यामुळे उंचावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

  • मुंबईच्या मानखुर्दमध्ये दहीहंडी तयारीदरम्यान गोविंदाचा मृत्यू झाला.

  • मृत गोविंदाचं नाव जगमोहन शिवकिरण चौधरी (वय ३२) आहे.

  • दोरी बांधताना तोल गेल्यामुळे उंचावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • या घटनेनंतर परिसरात खळबळ आणि शोककळा पसरली आहे.

मुंबईच्या मानखूर्दमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान, एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. दहीहंडीसाठी दोरी बांधताना बाल गोविंदा पथकातील गोविंदाचा तोल गेला आणि खाली पडला. उंचावरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जगमोहन शिवकिरण चौधरी (वय वर्ष ३२) असे मृत गोविंदाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष आहे. मात्र, मुंबईत या सणाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. मानखूर्दमधील बाल गोविंदा पथकातील गोविंदाचा मृत्यू झाला आहे. जगमोहन शिवकिरण चौधरी हा तरूण दहीहंडीसाठी दोरी बांधत होता. यादरम्यान, त्याचा तोल गेला. तो थेट खाली कोसळला.

उंचावरून खाली कोसळल्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. गंभीर जखमी अवस्थेत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर चौधरी कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबईत दहीहंडी उत्सवात ३० गोविंदा जखमी

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाले असल्याची माहिती विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांकडून मिळाली आहे. त्यापैकी १५ जणांवर उपचार सुरू असून, १५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सायन रुग्णालयात १८, केईएममध्ये ६ तर नायरमध्ये ६ गोंविदा दाखल झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Express Way: मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर मेगाब्लॉक, २३ अन् २४ एप्रिलला ३ तास वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये वीज पडून 55 वर्षे शेतकऱ्याचा मृत्यू

Lonavala : लोणावळ्यात व्हिला बुक करताय तर सावधान, ऑनलाईन स्कॅमद्वारे पर्यटकांची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, SIT चौकशीदरम्यान छातीत दुखू लागलं; नंतर रुग्णवाहिका बोलावली

Ratnagiri Tourism : लाल दगड अन् ब्रिटिश काळातील तोफ, 'हा' किल्ला जपतोय सागरी किनाऱ्यावरील ऐतिहासिक वैभव

SCROLL FOR NEXT