Mumbai Fire Saam tV
मुंबई/पुणे

Mumbai Fire Update: दादरमधील इमारतीला लागलेली आग अटोक्यात, कूलिंग ऑपरेशन सुरु

. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Fire Update : मुंबईतील दादर पूर्व भागातील एका रहिवासी इमारतीत लागलेली आग अटोक्यात आली आहे. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. इमारतीच्या 42 व्या मजल्यावर ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं.त्यानंतर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. (Latest News Marathi)

मुंबईतील दादर येथील पूर्व भागीतल आरए रेसिडेन्सी इमारतीला आग लागली होती. आरए रेसिडेन्सी इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर आग लागली होती. आगीत ४२ व्या मजल्यावरील संपूर्ण प्लॅट जळून खाक झाला. या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

रात्री साडेआठ वाजता लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवळपास १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घड्याळाच्या जाहिरातीत नेहमी 10:10 हीच वेळ का दिसते?

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Police Officer Transfer: मोठी बातमी! ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडक्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Tourism : पावसाळ्यात सुंदर दिसणारे पण धोकादायक आहेत 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स, जाण्याआधी १०० वेळा विचार करा

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

SCROLL FOR NEXT