Mumbai Crime News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: धक्कादायक! राहत्या घरात आढळला महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह; गेल्या दीड वर्षापासून...

Mumbai News: शरद सोसायटीमध्ये ५ व्या मजल्यावर त्यांच्या राहत्या घरातून मृतदेहाचा वास येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.

जयश्री मोरे

Mumbai Crime News: मुंबईच्या नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरातच आढळून आला आहे. येथील कामगार नगर येथील शरद सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे. शीतल एडके असे या ३५ वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत झोन 6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी माहिती दिली आहे. मुंबईच्या नेहरू नगर येथील महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आल्याचे माहिती राजपूत यांनी सांगितले. शीतल एडके असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. त्या मूळच्या नगर येथील रहिवासी होत्या. गेल्या दीड वर्षापासून आजारपणाच्या त्या रजेवर होत्या अशी माहिती राजपूत यांनी दिली आहे.

शील एडके या मुंबईतील कामगार नगर मधील शरद सोसायटीमध्ये येथील भाड्याच्या घरात राहत होत्या. त्या अविवाहित होत्या. दरम्यान शरद सोसायटीमध्ये ५ व्या मजल्यावर त्यांच्या राहत्या घरातून मृतदेहाचा वास येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घर उघडून पाहिले तेव्हा त्यांचा मृतदेह आढळला. (Mumbai Crime)

प्राथमिक माहितीनुसार शीतल एडके यांचा मृत्यू ३ ते ४ दिवस आधी झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सध्या ADR गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT