Dombivli Crime News: Saamtv
मुंबई/पुणे

Borivali Crime News: किरकोळ वाद विकोपाला गेला अन् घडलं भयंकर.. डोक्यात हातोडा घालून एकाची हत्या; परिसरात खळबळ

Latest Crime News: या घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai Borivali Crime News: मुंबईच्या बोरीवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गवंडी काम करणाऱ्या दोन मजूरांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका मजुराचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

गेल्या काही दिवसांपासून राज्यांमधील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईमधील मीरा रोडमधील (Mira Road Case) भयंकर हत्या कांडाचे प्रकरण चर्चेत असतानाच बोरीवलीमध्ये एक भयंकर हत्येची घटना उघडकीस आली आहे. या परिसरात एका गवंड्याने सोबत काम करणाऱ्या दुसऱ्या गवंड्याचा खून केला आहे.

गवंडी काम करणाऱ्या या दोन्ही मजुरांमध्ये चिडवा चिडवीतून किरकोळ वाद झाला. याच रागाच्या भरात एका मजूराने दुसऱ्याच्या डोक्यात हातोडा घालून त्याचा खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. (Crime News)

साताऱ्यात तरुणावर जीवघेणा हल्ला...

साता-यातील (Satara News) एका युवकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने पाेलिसांनी दाेन युवकांसह महिलेस ताब्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. साता-यातील राजवाडा या मध्यवर्ती युवकावर हल्ला झाल्याची माहिती समजताच पाेलिसांचा फाैज फाटा परिसरात दाखल झाला हाेता.

एसपी समीर शेख (samir shaikh sp satara) यांनी देखील स्वत: घटनास्थळी दाखल हाेत कनिष्ठ पाेलिस अधिका-यांना तपासाबाबत सूचना केल्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

SCROLL FOR NEXT