Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Mumbai Youth Set On Fire By Friends: मुंबईतील कुर्लामध्ये एका तरुणाला त्याच्या मित्रांनी वाढदिवस साजरा करताना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya More

Summary -

  • वाढदिवस साजरा करताना २१ वर्षीय तरुणाला मित्रांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला

  • मुंबईतल्या कुर्ला परिसरात ही घटना घडली

  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ व्हायरल झाला

  • या प्रकरणी ५ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली

मयूर राणे, मुंबई

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत असताना एका तरुणाला त्याच्याच मित्रांनी जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या कुर्ला परिसरातील ही घटना आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर फेज - ३ बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याठिकाणी २१ वर्षीय तरुणाचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे ५ मित्र आले होते. केक कापत असताना या तरुणाच्या मित्रांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाला पेटवून दिल्यानंतर त्याचे मित्र त्याठिकाणी डान्स करताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

या घटनेमुळे मुंबई हादरली. या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ५ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या सर्व तरुणांनी असं कृत्य का केले? याची माहिती समोर आली नाही. सध्या पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT