Mumbai Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : स्वातंत्र्यदिनी दारू पिऊन पोलीसांशी हुज्जत, अर्वाच्य भाषेत शिविगाळ; पोलिसांनी दाखवला इंगा

Mumbai Crime : मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने पोलिसांशी हुज्जत घालत अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Sandeep Gawade

मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला पोलिसांशी हुज्जत घालणं आणि शिविगाळ करणं चांगलंच महागात पडलं आहे. वाहन परवाना नसतानाही या तरुणाने मद्यपान करून पोलिसांशी हज्जत घातली. तसंच पोलीस अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्या तरुणाला खाक्या दाखवत गुन्हा दाखल केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट च्या रात्री चार बंगला लोखंडवाला रोडवर पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती या नाकाबंदी दरम्यान नशेत बेधुंद असलेल्या वाहन चालकाची गाडी पोलिसांनी अडवली यावेळी वाहन चालकाकडून रस्त्यावर उतरून पोलिसांना शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला तरुणांकडून पोलिसांना थांबवण्यात देखील आलं यानंतर पोलिसांनी तरुणाला पोलीस ठाण्यात आणून त्या विरोधात मद्यपान करून गाडी चालवणे लायसन्स सोबत न बाळगणे या कारणासाठी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आज आरोपीला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयासमोर आरोपीने आपला गुन्हा मान्य केला . यामुळे न्यायालयाने त्याला दहा हजाराचा दंड सोनावला असून आरोपीला सोडण्यात आले आहे मात्र वर्सोवा पोलिसांनी आता मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या तरुणाचे वाहन परवाना रद्द करण्यासाठी आरटीओ कडे पत्र व्यवहार देखील केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT