Threat In Mantralaya Saam TV
मुंबई/पुणे

Threat In Mantralaya: मंत्रालयात नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन; अतिरेकी हल्ल्याची भीती, एकाला अटक

Mantralay Threat Call News: सोमवारी रात्री १० वाजता मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवार धमकीचा फोन आलाय.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mantralaya News: राज्यात धमक्यांचे सत्र संपता संपत नाहीये. नागरिकांची गजबज असलेली ठिकाणे, राज्यातील मंत्री, पोलीस अधिकारी यांना अतिरेकी धमक्यांचे फोन येत आहेत. अशात आता देखील मंत्रालयात असाच एक धमकीचा फोन आला आहे. (Latest Marathi News)

अधिक माहिती अशी की, मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला आहे. एक दोन दिवसात अतिरेकी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी रात्री १० वाजता मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवार धमकीचा फोन आलाय.

अतिरेकी हल्ला नेमका कोणत्या ठिकाणी होणार याचं स्थळ धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलं नाही. धमकीचा फोन येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. फोन येताच मुंबई पोलीस सतर्क झालेत. धमकीचा कॉल ट्रेस करण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच तपासात कांदिवली येथून एका संशयीताला ताब्यात घेतलंय.

धमकीचा फोन का करण्यात आला. यामध्ये खरंच काही तथ्य आहे का? याची पडताळणी मुंबई पोलीस करत आहेत.दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांना देखील धमकीचा फोन आला होता. मुंबई लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

यंदा वटपौर्णिमेला नेसा पैठणी साड्या, हे आहेत लेटेस्ट 5 पॅटर्न

Shocking : मैत्रीनं केला घात! गोड बोलून ९वीच्या विद्यार्थिनीला बाथरूममध्ये नेलं, गळा दाबला नंतर चाकू भोसकला

Prahaar: मराठीचा चॉकलेट बॉय आता कसाबच्या भूमिकेत...; राजकुमार रावच्या प्रहारमध्ये या मराठमोळ्या अभिनेत्याची दमदार एन्ट्री

Maharashtra News Live Update: हे राज्य बदनाम होत आहे, महाराष्ट्र असा नव्हता - खासदार संजय राऊत

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कोकणातील बड्या नेत्याने मशाल घेतली हाती

SCROLL FOR NEXT