Mumbai Mulund Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबईच्या मुलुंडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; मध्यरात्री 4 दुकाने फोडली, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Mumbai Mulund Crime News : मुंबईच्या मुलुंड पूर्व विभागात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नवघर येथे सोमवारी रात्री चोरट्यांनी तब्बल 4 दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय.

Satish Daud

मुंबईच्या मुलुंड पूर्व विभागात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नवघर येथे सोमवारी रात्री चोरट्यांनी तब्बल 4 दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. चोरीची ही घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक धास्तावले असून गणेशोत्सवाच्या काळात घर सोडून गावी जायचे तरी कसे? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून नागरिकांकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पूर्व (Mumbai News) परिसरातल्या नवघर येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी 6 दुकानांचा लॉक तोडून चोरीचा प्रयत्न केला. यातील 2 दुकानांचे लॉक मजबूत असल्याने चोरट्यांना चोरी करता आली नाही.

मात्र, 4 दुकानांचे लॉक तुटल्याने चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. दुकानात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंसह रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. धक्कादायक बाब म्हणजे, यातील चोरी झालेल्या एका ठिकाणाहून 50 मीटर अंतरावर पोलिसांची (Police) बीटचौकी आहे. तरीही चोरट्यांनी इतक्या शिताफीने चोरी केली की पोलिसांना थांगपत्ता देखील लागू दिला नाही.

ऐन गणेशोत्सव काळात चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असल्यामुळे व्यापाऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या या घटना अशाच सुरू राहिल्यास गणेशोत्सव काळात घर सोडून गावी जायचे तरी कसे? असा प्रश्न अनेकांना पडलाय. याप्रकरणी मुलुंड नवघर पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT