सचिन गाड
mumbai News: बनावट नोटांच्या एका गुन्ह्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठा खुलासा केला आहे. २०२१ सालाच्या एका प्रकरणात थेट दाऊद गँग म्हणजेच डी कंपनी चा हात आल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी NIA ने मुंबईत सहा ठिकाणी छापे टाकले होते, त्या दरम्यान जप्त करण्यात आलेली हत्यारे, तांत्रिक उपकरणे आणि कागदपत्रे याद्वारे NIA ने हा दावा केला आहे. (Latest Marathi News)
डी कंपनीचा पसरवतेय भारतात बनावट नोटा
काही दिवसापूर्वी NIA ने मुंबईत सहा ठिकाणी धाडी टाकल्या. २०२१ सालच्या बनावट नोटाप्रकरणी आरोपी असलेल्या रियाझ आणि नासीर यांच्या घर आणि कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या.
यावेळी धार धार हत्यारे, तांत्रिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आणि हे पुरावे थेट या प्रकरणाचा संबंध दाऊद गँग शी जोडण्यात पुरेसे असल्याचा दावा NIA ने केला आहे.
१८ नोव्हेंबर २०२१ साली ठाण्याच्या नौपाडा येथे दोघांना २००० रुपये छापील किंमत असलेल्या एकूण १९८ बनावट नोटा प्रकरणी अटक केली होती. नोटांचा दर्जा चांगल्या प्रतीचा असल्याने NIA ने हे प्रकरण आपल्याकडे तपासाला घेतलं. या प्रकरणी दोन्ही आरोपी अद्याप कारागृहात असून त्यांच्या विरोधात देखील दाखल आहे
बनावट नोटां संदर्भातील गुन्हे हे गंभीर असतात कारण त्यांचा थेट संबंध हा देशाच्या अर्थव्यवस्थेची असतो त्यांच प्रमाण चलनात वाढल्यास त्याचे मोठे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेला पर्यायाने देशाला भोगावे लागू शकतात, म्हणून एक लाख रुपये किमतीच्या गुन्हे देखील भारताची सर्वोत्तम तपास यंत्रणा राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA आपल्याकडे तपासाला घेते नोटांचा दर्जा हा एकमेव त्यांचा मापदंड असतो.
भारत नेहमीच दावा करत आला आहे की बनावट नोटा देशात पसरवण्यात डी कंपनी आणि पाकिस्तानचा हात आहे. NIA च्या या खूलाश्याने त्या दाव्याला आणखीन बळ मिळाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.