Oshiwara Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मौलवी शिक्षकाला अटक; अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

शिक्षकावर गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai Latest Crime News : मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरात दोन अल्पवयीन बालकांचे लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 वर्षीय 2 अल्पवयीन मुलांचे 25 वर्षीय शिक्षकाने लैंगिक शोषण केले होते. शिक्षकावर गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी (police) सांगितले की, आरोपी शिक्षकाने जोगेश्वरी पश्चिमेकडील दोन 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले. पीडित बालकाच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपीच्या विरोधात पाॅक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

आरोपी शिक्षक हा अरबी आणि उर्दू विषय शिकवण्यासाठी त्या मुलांच्या घरी जात असे.4 डिसेंबर 2022 रोजी, 25 वर्षीय मौलवी शिक्षकाने त्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत लैंगिक चाळे केले.

शिक्षकाच्या या कृती विषयी त्या दोन्ही अल्पवयीन बालकांनी आपल्या आई-वडिलांना सांगितले त्यानंतर पालकांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दिली. पालकांच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी मौलानाविरुद्ध पोक्सो गुन्हा दाखल करून शुक्रवारी मौलानाला अटक केली.ओशिवरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT