Kandivali Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मोलकरणीनेच मारला घरातील दागिन्यांवर डल्ला; लाखोंचा मुद्देमाल केला लंपास

कांदिवली पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईच्या कांदिवलीमधील अनुजा जयेश मोदी यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने लाखो रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपिका पवार असे या मोलकरणीचे नाव असून, कांदिवली पोलिसांनी अवघ्या 24 तासात तिला अटक करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासात पोलिसांनी (police) आरोपी मोलकरणीस मीरा रोड परिसरातून अटक (Arrest) केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनुजा जयेश मोदी या कांदिवली पश्चिम महावीर नगर येथे कुटुंबासह राहतात. अनेक महिन्यांपासून दीपिका पवार नावाची महिला तक्रारदार यांच्या घरी घरकाम करते. (Crime News)

कपाटातून 7 लाख 58 हजार 500 रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार अनुजाने कांदिवली पोलिस ठाण्यात दिली. या घटनेची नोंद करून कांदिवली पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला. पोलिसांच्या संशयाची सुई त्यांची मोलकरीण दीपिका पवार हिच्यावर गेली. पोलिसांनी दीपिका पवार मीरा भाईंदर हिच्या घरी जाऊन झडती घेतली असता चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दीपिका पवारला चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT