Mumbai Malad Marriage News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धुमधडाक्यात लग्न लागलं, पण हनिमूनच्या रात्रीच नवरी फरार; दागिने आणि रोकडही केली लंपास

Mumbai Malad Marriage News: नवरदेव हनिमूनची वाट पाहत असताना नवरी फरार झाली. पळून जाताना तिने लग्नातील दागिने सुद्धा लंपास केले.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Malad Crime News: धुमधडाक्यात लग्न लागलं. नवरीला घेऊन नवरदेव घरी आला. सत्यनारायणाची पूजा देखील पार पडली. घरात नववधूचं आगमन झाल्यानंतर कुटुंबिय आनंदात होतं. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. नवरदेव हनिमूनची वाट पाहत असताना नवरी फरार झाली. पळून जाताना तिने लग्नातील दागिने सुद्धा लंपास केले.

मुंबईच्या मालाड परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवऱ्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून लग्न जमवून देणाऱ्या दलालास ताब्यात घेतलं आहे.

कमलेश कदम असं अटक करण्यात आलेल्या दलालाचं नाव आहे. नवरी मुलगी अद्यापही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड (Mumbai News) परिसरात राहणाऱ्या वृषभ मेहता या तरुणाचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून वृषभने कमलेश कदम या दलालाची भेट घेतली.

कमलेशने १५ हजार रुपये घेऊन आशा गायकवाड या ३० वर्षीय तरुणीसोबत वृषभचे लग्न (Wedding) लावून दिले. थाटामाटात लग्न लागल्यानंतर वृषभ नवरीला घेऊन घरी आला. घरात नववधूचे आगमन झाल्यामुळे वृषभचे कुटुंबिय आनंदात होते.

मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. हनिमूनच्या रात्रीच नव्या नवरीने घरातील दीड लाख रुपये आणि ४ तोळे सोने घेऊन धूम ठोकली. नवरी मुलगी पळून गेल्याचं लक्षात येताच मेहता कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी लग्न जमवून देणाऱ्या दलालाविरोधात फसवणूकीचा (Crime News) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी पळून गेलेल्या नवरीचा शोध सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या दलाल कमलेश कदम मालाड पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अशाप्रकारे किती लोकांची लग्नात जुळवून दिले कोणाकोणाची फसवणूक केली याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

SCROLL FOR NEXT