Mumbai Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धक्कादायक! शिक्षिकेचा मोबाईल गेला होता चोरीला, आई-वडिलांसह मित्रांना पाठवले अश्‍लील मेसेज

Mumbai Crime News: लोअर परेल येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय शिक्षिकेची समाजमाध्यमांवर बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Sandeep Gawade

Mumbai Crime News

लोअर परेल येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय शिक्षिकेची समाजमाध्यमांवर बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने पीडित शिक्षिकेच्या आई-वडिलांसह मित्रांना अश्‍लील मेसेज आणि फोटो पाठवले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

तक्रारदार महिला एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. १७ जानेवारीला नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना त्यांचा मोबाईल पर्समधून चोरीस गेला होता. ३१ जानेवारीला त्यांच्या आई-वडिलांना एका मोबाईलवरून अश्‍लील मेसेज आले होते. त्यात तिच्याविषयी आक्षेपार्ह अश्‍लील मजकूर होता. अशाच प्रकारचे काही मेसेज त्यांच्या मित्रांनाही पाठवण्यात आले होते. त्यासोबतच शिक्षिकेचे त्यांच्या मित्रांसोबतचे काही फोटो पाठवण्यात आले होते. शिक्षिकेच्या चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोटो आरोपीने त्यांच्या आई-वडिलांसह मित्रांना पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच शिक्षिकेने ना. म. जोशी मार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर विवाहितेचा फोटो शेअर केल्याच्या रागातून खून

सोशल मीडियावर विवाहितेचा फोटो शेअर केल्याने एका तरुणाला मारहाण झाली. मारहाण केल्यामुळे संतापलेल्या तरुणाने जाब विचारणाऱ्यापैकी एकाच्या छातीवर चाकू हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना धुळे जिल्ह्यातील हेंद्रुण गावात घडलीय. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या दोघा भावांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. 

या घटनेप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, हेंद्रुण येथील अनिल अशोक सूर्यवंशी गावातील एका विवाहित महिलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला शेअर केला होता. हा प्रकार समजताच विवाहितेचा पती संतापला. फोटो का शेअर केला याचा विचारण्यासाठी विवाहितेचा पती आणि त्याच्या दोन भावांसह अनिलच्या घरी गेला. पत्नीचा फोटो का शेअर केला असा जाब अनिल सूर्यवंशीला विचारला, त्यावेळी संतप्त झालेल्या अनिल सूर्यवंशीने त्याच्याकडील चाकूने विवाहितेच्या चुलत दिरावर चाकू हल्ला केला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT