Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मित्राच्या बायकोची काढली छेड; पोलिसावर गुन्हा दाखल

वरळी पोलीस कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शेजारी राहणाऱ्या सहकार्याच्याच बायकोची छेड काढणाऱ्या पोलीस (Police) शिपायावर वरळी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची घटना समोर आली आहे. वरळी पोलीस कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल व तक्रारदार महिला या शेजारीच राहतात. पीडित महिलेला पाहून तक्रारदार वारंवार अश्लील चाळे व इशारे करत असल्याचे पीडितेने आरोप केले आहेत. (Mumbai Crime News)

पोलिसांनी (Police) दिलेला माहिती अशी, वरळी पोलीस कॅम्प परिसरातील एक पोलीस शिपाई आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेला रोज अश्लिल इशारे करायचा. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल व तक्रारदार महिला या शेजारीच राहतात. रोजच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर वरळी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

वरिष्ठांनीही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी सचिन सणस याच्यावर ३५४ (अ), ५०९ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT