Mumbai Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime : तरुणीला दारू पाजली, पाण्याच्या टाकीवर नेलं अन्... मुंबईतील प्रियकराचं धक्कादायक कृत्य

मुंबईतील दहिसर भागात देखील एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News : वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्या प्रकरणात अवघा देश हादरला असताना, मुंबईतून एक धक्कादायक घटना (Mumbai Crime) उघडकीस आली आहे. मुंबईतील दहिसर भागात देखील एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दहिसर पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

अमेय दरेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराने नाव असून तो बोरिवली परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी झालेली तरुणी प्रीयांगी सिंग हे दोघेही एकमेकांचे परिचित असून त्यांच्यात प्रेम संबंध आहेत. रविवारी रात्री प्रियांगी आपला प्रियकर अमेय दरेकर याला भेटण्यासाठी बोरिवली येथील त्याच्या निवासस्थानी गेली.

रात्री त्यांच्यात काही वाद झाल्यानंतर प्रियांगी हिला टाकीवरून धक्का (Crime News) मारून ढकलले. यामुळे ते अंदाजे 18 फूट खाली पडल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर इजा झाली. जेव्हा ही घटना घडली तेव्हा दोघांनीही मद्यपान केले होते. भांडण झाल्यानंतर आरोपी अमेयाने प्रियांगीला टाकीवरून ढकलून दिले. या घटनेत तरुणीच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर इजा झाली.

अशाच अवस्थेत दुसऱ्या दिवशी सकाळी अमेय आणि त्याच्या आईने प्रियांगीला तिच्या आई-वडिलांच्या घरी आणून सोडून निघून गेले. यानंतर प्रियंकाचे वडील यांनी यासंदर्भात दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र प्रकरणं दहिसर पोलीस ठाणे हद्दीत घडले असल्यामुळे पुढील तपासासाठी ते आता दहिसर पोलिसांना सोपवण्यात आलं आहे.

दहिसर पोलिसांनी आरोपीविरोधात अटेंड टू मर्डर (खुनाचा प्रयत्न) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असता, त्याला त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT