Mumbai Crime  Saam tv
मुंबई/पुणे

'तुला जिवंत सोडणार नाही'; रस्त्यात अडवून तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार, मुंबईतील घटना

Mumbai Crime : रस्त्यात अडवून तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या वर्सोव्यातील ही घटना आहे.

Vishal Gangurde

वर्सोव्यात रुग्णालयातून परतताना तरुणावर जीवघेणा हल्ला

ओळखीच्या दोघांसह तिघांविरुद्ध गुन्हा

मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील सात बंगला परिसरात 9 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद जायद शेख (वय अंदाजे 30) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मोहम्मद तुंगा रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेऊन परतत असताना सात बंगला परिसरातील वर्सोवा सोशलजवळ त्यांना तिघांनी अडवले. त्यापैकी दोघे जण शेख यांच्या ओळखीचे असून तिसरा इसम अनोळखी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी आधी वाद घालत 'तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिली आणि त्यानंतर लोखंडी हत्याराने शेख यांच्यावर सपासप वार करत गंभीर मारहाण केली. हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी शेख यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तक्रारीत या हल्ल्यामागे पूर्वीचा वाद कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हुझैफा गिलानी या व्यक्तीने हल्ल्याचा कट रचल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वर्सोवा पोलिस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा सखोल तपास करत आहे. तर आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि शोधमोहीम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT