Titwala Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Titwala Crime News: पत्नीनेच केली पतीची गळा दाबून हत्या; भयंकर घटनेने टिटवाळ्यात खळबळ

Crime News Update: टिटवाळा (Titwala) येथील बल्यानी परिसरात पत्नीने पतीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी...

Mumbai Crime News: टिटवाळा परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. टिटवाळ्याच्या बल्यानी परिसरात पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे पतीची हत्या केल्यानंतर दारू मुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने केला होता. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या बनावाचा भांडाफोड झाला. (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, टिटवाळा जवळ बल्याणी परिसरात परिसरात प्रवीण मोरे व प्रणिता मोरे हे पती पत्नी राहत होते. प्रवीणला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो पत्नी प्रणिताशी वाद घालायचा. ३ ऑगस्ट रोजी प्रवीण दारू पिऊन घरी आला त्याने प्रणिताशी वाद घालण्यास सुरुवात केली.

याच वादातून संतापलेल्या प्रणिताने प्रवीणची गळा आवळून हत्या केली. हत्येचे कृत्य लपवण्यासाठी प्रणिताने दारू पिल्याने प्रवीणचा मृत्यू झाल्याचे भासवले. प्रवीणच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. टिटवाळा पोलिसांना प्रणितावर संशय आला.

पोलिसांनी प्रणिताला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता प्रणिताने प्रवीणची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून पतीची हत्या केल्याची ही कबुली प्रणिताने दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात आरोपी प्रणिता मोरेला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT