Mumbai Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाने केला अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Shocking News : आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने स्वच्छतागृहात नेऊन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. कांदिवली परिसरातील ही घटना घडली आहे.

प्रविण वाकचौरे

सचिन गाड

Mumbai Crime News :

चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी शिकत असलेल्या नर्सरीच्या सुरक्षा रक्षकानेच हे दुष्कृत्य केलं आहे. पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केलाी आहे.

आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने स्वच्छतागृहात नेऊन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. कांदिवली परिसरातील ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी शुक्रवारी नर्सरीमध्ये गेली होती. त्यावेळी सुरक्षा रक्षक तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाथरूममध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरी गेल्यानंतर मुलीला त्रास व्हायला लागला. आईने तिला जवळील हॉस्पिटलमध्ये नेले. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर पालकांना धक्काच बसला. डॉक्टरांनी मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती पालकांना दिली. त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन विचारलं असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. (Latest Marathi News)

त्यानंतर पालकांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी ५५ वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक केली. पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT