Mumbai Crime News Latest Update, Mumbai Latest Marathi News  SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबई हादरली! १९ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

नोकरीच्या शोधात पीडित महिला मुंबईत आली होती. तिला मेहुण्याने या शहरात आणले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली. नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नेहरू नगर परिसरात घडली. (Mumbai Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कोलकाता येथील मूळची रहिवासी आहे. ती दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आली होती. नोकरीच्या शोधात ही महिला मुंबईत आल्याची माहिती मिळते. तिचा मेहुणा तिला मुंबईत घेऊन आला होता. त्याने पीडितेला कुर्ला पूर्वेतील बर्मा सेल लाइन परिसरात झोपडीत राहणाऱ्या तिघांच्या हवाली केले होते. त्या बदल्यात त्याने पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी चार जणांना अटक केली आहे. (Mumbai Crime News)

सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची कोलकाताची आहे. मार्च महिन्यात ती मुंबईत आली होती. तिला तिचा मेहुणा मुंबईत (Mumbai) घेऊन आला होता. ती नोकरीच्या शोधात या शहरात आली होती. मेहुण्याने तिला गोवंडीत आणले होते. त्यानंतर कुर्ला येथील बर्मा सेल लाइन परिसरातील झोपडीत राहणाऱ्या तिघांकडून त्याने पैसे घेतले आणि पीडितेला त्यांच्या ताब्यात दिले.

या तिघांनी पीडितेवर अत्याचार केले. या धक्कादायक प्रकाराने ती भेदरली. या घटनेबाबत तिने कोणालाही सांगितले नाही. तीन महिन्यांनंतर पीडितेने नेहरू नगर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपी मेहुणा तसेच इतर तिघा आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी चौघांनाही अटक केली. सर्व आरोपींना बुधवारी कोर्टात (Court) हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT