Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; वांद्रे परिसरातील संताजनक घटना

Girl Physically Abused By 2 People In Bandra: मुंबईतल्या वांद्रे परिसरात सामूहिक बलात्काराची घटना घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली तर दुसरा फरार असून पोलिस शोध घेत आहेत.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईमध्ये सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे परिसरात १८ वर्षींय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी एकाला अटक केली तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलिस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेमुळे वांद्रे परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे परिसरात १८ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. काकांच्या घरी सोडण्याचे आश्वासन देऊन पीडित तरुणीला कारमध्ये बसवले. आरोपींनी पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध मिसळलेले पेय पाजले. बेशुद्ध झालेल्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. यासंदर्भात तक्रार केल्यास जीवे मारण्याची देखील पीडितेला धमकी देण्यात आली.

पीडित तरुणीने याप्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ३१ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT