Mumbai Crime News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबई पुन्हा हादरली! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या, मृतदेहाचे केले अनेक तुकडे

Mumbai Live In Relationship Murder News: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरारोडमध्ये एका मुलीची हत्या करण्यात आली आणि तिच्या धडाचे अनेक तुकडे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News: वसईच्या श्रद्धा वालकरसोबत दिल्लीत जे घडलं, तसाच काहीसा प्रकार आता महाराष्ट्रात एका मुलीसोबत घडलाय. विशेष म्हणजे चर्चगेटमध्ये तरुणीची हॉस्टेलमध्ये हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरारोडमध्ये एका मुलीची हत्या करण्यात आली आणि तिच्या धडाचे अनेक तुकडे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

ही मुलगी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. तिच्या खोलीचा दरवाचा उघडल्यानंतर पोलिसांना धडाचे अनेक तुकडे आढळून आले आहेत. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्ट मार्टमरासाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून याबाबत नया नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra Breaking News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील मृत तरुणीचं वय 32 वर्ष असून ती मागील काही काळापासून मनोज नावाच्या ५५ वर्षीय व्यक्तीसोबत मीरा रोड येथील गीता नगरच्या सातव्या मजल्यावर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. बुधवारी तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळ घराला कुलूप लावलेले होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना तिथे महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. त्यातील काही अवशेष हे गायब करण्यात असल्याचे कळतंय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Breaking News)

आरोपी मनोज आणि मृत मुलगी हे दोघे मागील अनेक महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत भांडणं होत होती. याच वादातून मनोजने तिची धारदार शस्त्राने हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे लहान लहान तुकडे करून काही तुकडे फेकून देखील दिले आहेत. आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली याबाबतचा अधिकचा तपास नया नगर पोलीस करत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : नाशिकमध्ये नदीत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ समोर; पत्नीने भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने रचला कट

Summer Season Blouse Designs: उन्हाळ्यात डेली वेअरसाठी 'स्लीव्हलेस' की 'एल्बो लेंथ' कोणता ब्लाऊज पॅटर्न निवडावा?

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १०,९०० रुपयांनी झालं स्वस्त, तुमच्या शहरातील २४- २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Maharashtra Live News Update : गॅस सिलिंडरच्या तुटवड्याविरोधात काँग्रेस नेत्यांच आंदोलन

Famous Actress Wedding : टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाह बंधनात, लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT