Mumbai Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : बॉयफ्रेंड देत होता लग्नास नकार; गर्लफ्रेंडने मागवलं ऑनलाईन विष अन्...

महेंद्र वसंत भोईर असं पीडितेवर अत्याचार करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे. २०१८ पासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.

अजय दुधाणे

Mumbai Crime News : महाविद्यालयात शिक्षण घेत (Mumbai) असलेल्या २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने अनेक वेळा अत्याचार केले. त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिल्याने पीडित तरुणीने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असुन अत्याचार करणाऱ्या तरुणावर बदलापुर (Badlapur) पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Badlapur News Today)

महेंद्र वसंत भोईर असं पीडितेवर अत्याचार करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे. २०१८ पासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. एप्रिल २०२२ रोजी प्रियकराने स्वतःच्या कार मध्ये बसवून पीडितेला फिरण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर कारमध्येच अत्याचार केला. या घटनेमुळे पीडित भयभीत होऊन रडत असतानाच प्रियकराने तिची समजूत काढत लग्नाचे आमिष दाखवून वेळ मारून नेली.

त्यानंतर पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून मे २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यत वारंवार तिच्यावर अत्याचार केले. मात्र त्यानंतर आरोपी महेंद्र याने पीडितेशी बोलणे बंद करून तिचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला. त्यामुळे व्यथित झालेल्या पीडित तरुणीने गुगलवर विष विक्री करणाऱ्या कंपनीचे नाव सर्च करून त्या कंपनीकडून ऑनलाईन ५० ग्राम विषारी औषध मागवलं. ते विष ती पर्समध्येच घेऊन फिरायची. (Mumbai Crime News Today)

दरम्यान २४ सप्टेंबर रोजी पुन्हा आरोपी महेंद्र याने कारमध्ये बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. त्याचवेळी पीडितेने पर्समध्ये असलेले विष कारमध्येच प्राशन केले. घाबरलेल्या आरोपी महेंद्र याने पीडितेला तातडीने कारमधून घरी सोडले.

अखेर तरुणीची प्रकृती खालावतच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बदलापूर पोलिसांनी आरोपी महेंद्र भोईर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

Maharashtra News Live Update: सैराट फेम आरबाज शेख याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत 1 लाख रुपयाचा चेक देऊन करण्यात आली मदत

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

SCROLL FOR NEXT