Kalyan Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Crime News: धक्कादायक! कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात तरुणाची आत्महत्या

या धक्कादायक बातमीने स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख

Mumbai: कल्याण स्टेशन परिसरात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धक्कादायक बातमीने स्टेशन परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकला लटकून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. पहाटे स्टेशन परिसरात असलेल्या काही जणांनी मृतदेह लटकताना पाहिला याची माहिती पोलिसांना दिली .

घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. विठ्ठल मिसाळ असे या तरुणाचे नाव असून तो बीड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे .

दरम्यान, या धक्कादायक घटनेने कल्याण (Kalyan News) रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणाने आत्महत्या का केली याबद्दलचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT