Corona Patients in Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Corona Update : मुंबईत मास्क सक्ती होणार का? आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती

Mumbai Corona Update : डॉ. दक्षा शहा यांनी म्हटलं की, हा नवा व्हेरिएंट सौम्य आहे. ओमिक्रोनचा हा सब व्हेरिएंट आहे. मुंबई महापालिकेने नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवेश तांदळे

Mumbai Corona Update :

देशभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या नव्या JN.1 या व्हेरिएंटमुळे प्रशासनाची देखील चिंता वाढला आहे. जगभरात या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशभरात या व्हेरिएंट २१ रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका देखील सतर्क झाली आहे. मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी काही गाईडलाईन जारी केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

डॉ. दक्षा शहा यांनी म्हटलं की, हा नवा व्हेरिएंट सौम्य आहे. ओमिक्रोनचा हा सब व्हेरिएंट आहे. मुंबई महापालिकेने नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. महापालिका आयुक्तांनी देखील याबाबत आढावा घेतला. हॉस्पिटलमधील बेड्स, औषधे यांची उपलब्धता देखील तपासलीआहे.

मुंबईत मास्क सक्ती नाही

सर्दी, खोकला, ताप असेल तर स्वतः हून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. मुंबईत सध्यातरी मास्क सक्तीचा विचार नाही. मात्र नागरिक मास्क स्वतः इच्छेने वापरू शकतात. ज्यांना हाय रिस्क आहे, त्यांनी दुर्लक्ष करू नये . जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात जाऊन टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन दक्षा शहा यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

SCROLL FOR NEXT