Coastal Road  Saam Tv
मुंबई/पुणे

Coastal Road : नव्या वर्षात मुंबईकरांना मोठं गिफ्ट, कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात

Mumbai Coastal Road : नव्या वर्षांत मुंबईकरांना कोस्टल रोडचे गिफ्ट मिळणार आहे. ९५ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झालेय. दोन आठवड्यात काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Coastal Road Project: नव्या वर्षात मुंबईकरांना कोस्टल रोडचं (सागरी किनारा मार्ग) गिफ्ट मिळणार आहे. आतापर्यंत कोस्टल रोडचे ९५ टक्के काम पूर्ण झालेय. उर्वरित काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. २०२५ मध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस हा रस्ता मुंबईकरांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

मुंबई सागरी किनारा मार्गावरील हाजी अली ज्यूस सेंटर ते वरळी नाक्यापर्यंतची आंतरबदल मार्गिका २ बीएमसीने बुधवारी खुली केली. त्यामुळे हाजी अली ते वांद्रे वरळी सी लिंक दरम्यानच्या आठपैकी सहा आंतरबदल मार्गिका सुरू झाल्यात. उर्वरित दोन मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यतात आहे. आतापर्यंत ९५ टक्के काम पूर्ण झालेय. महिनाभरात हे काम १०० टक्के पूर्ण होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोस्टल रोड सेवेत येण्याची शक्यता आहे.

संपूर्ण कोस्टल रोडचे काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत विलंबाने होत असलेल्या कामाला आता गती मिळाली आहे. कोस्टल रोडच्या अंतिम टप्प्यातील सी लिंक विस्तारासाठी उत्तरेकडील गर्डरची उभारणी करण्याचे काम पूर्ण झालेय. यानंतर काँक्रिटकीरण, विद्युत खांबाची उभारणी यासह इतर तांत्रिक कामे दोन आठवड्यात पूर्ण होतील. त्यानंतर संपूर्ण मार्गिका सुरू करण्यात येईल.

महत्त्वाचे टप्पे - 11 मार्च 2024 रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह 9.29 किमी. दक्षिणवाहिनी मार्गिका. 10 जून रोजी मरीन ड्राईव्ह ते लोटस जंक्शन 6.25 किमी उत्तरवाहिनी मार्गिका. 11 जुलै रोजी हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडणारी मार्गिका सुरू.

पुढील नियोजन : सद्यस्थितीत प्रकल्पाचे 92 टक्के काम पूर्ण. प्रकल्पातील वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारा उत्तर वाहिनीवरील मुख्य पूल व वरळी आंतरबदल डिसेंबर 2024 पर्यंत तर हाजीअली आंतरबदल येथील उर्वरित कामे (मार्गिका क्रमांक 1, 6 व 7) 2025 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT