Mumbai Coastal Road BMW Accident: 
मुंबई/पुणे

Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यू कारचा अपघात, ३ तरुणांचा मृत्यू, १ गंभीर

Mumbai Coastal Road BMW Accident: मुंबईच्या कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar, Ganesh Kavade

Coastal Road Accident Death Toll : मुंबईतील कोस्टल रोडवर पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या एका काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत ३ तरुणांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. त्याची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे.

नेमकी घटना काय घडली?

कोस्टल रोड कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ५:२० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. एक काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने अत्यंत वेगाने जात होती. कोस्टल रोडवरील 'लाला कॉलेज'समोर आणि 'लोटस जेटी'जवळ आल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कारचा भीषण अपघात झाला.

अपघातानंतर सर्व ४ जखमींना तातडीने नायर रुग्णालयात (Nair Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यामधील तरूणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शनाय गज्जल (वय २१ वर्षे), धैर्य सेठ (वय १७ वर्षे) आणि आणखी एका २५ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. त्याची ओळख पटवणयाचे काम सुरू आहे. एका तरूणावर सध्या उपचार सुरू आहे. २० वर्षाच्या तरूण अत्यंत गंभीर अवस्थेत असून रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस तपास सुरू

हा अपघात अतिवेगामुळे (Overspeeding) झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच कोस्टल रोड पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत आणि जखमी तरुणांची अधिक ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

SCROLL FOR NEXT