Mumbai : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण  SaamTvNews
मुंबई/पुणे

Mumbai : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण

गिरगाव चौपाटी लगत नव्याने उभारण्यात आलेल्या 'दर्शक गॅलरी'चे लोकार्पण करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गिरगाव चौपाटी लगत नव्याने उभारण्यात आलेल्या 'दर्शक गॅलरी'चे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या 'दर्शक गॅलरी' चे भूमिपूजन गेल्यावर्षी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या ७ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन आज याचे लोकार्पण करण्यात आले.

हे देखील पहा :

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी संपन्न झालेल्या लोकार्पण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, आमदार मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते.

या प्रकल्पांतर्गत समुद्राचे, चौपाटीचे आणि ‘क्विन्स नेकलेस’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय, विहंगम व मनमोहक दर्शन घडविणा-या या गॅलरीची उभारणी करण्यात आली आहे. भरती – ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन त्या अनुरुप ही गॅलरी उभारण्यात आली आहे. 'दर्शक गॅलरी' अर्थात सदर 'व्ह्युईंग डेक'वर एकाच वेळेस किमान ५०० पर्यटकांना सागरी सौंदर्य न्याहाळता येणार आहे. तसेच 'नेताजी सुभाष मार्ग' अर्थात राणीच्या रत्नहाराप्रमाणे दिसणा-या 'मरिन ड्राईव्ह'चे विहंगम दृश्य हे डोळ्याचे पारणे फेडणारे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT