Mumbai Firing  Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : मुंबई हादरली! पेट्रोल पंपावर बिल्डरवर गोळीबार, दोन गोळ्या पोटात घुसल्या

Mumbai Firing : मुंबईत पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली आहे. दोघांकडून पेट्रोल पंपावर बिल्डरवर गोळीबार करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

मुंबईच्या चारकोपमध्ये हादरवणारी घटना

चारकोपमध्ये भरदिवसा बिल्डरवर गोळीबार

अज्ञातांनी झाडलेल्या गोळ्या बिल्डरच्या पोटात घुसल्या

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईतून हादरवणारी घटना समोर आली आहे. मुंबईच्या चारकोप परिसरात एका बिल्डरवर गोळीबार करण्यात आला आहे. दोघांनी पेट्रोल पंपावर असलेल्या बिल्डरवर गोळीबार केला. दोन अज्ञातांनी झाडलेल्या गोळ्या थेट पोटात घुसल्याने बिल्डर गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

मुंबईच्या चारकोप परिसरात बिल्डरवर दोघांनी गोळीबार केला. चारकोपच्या बंदर पाखाडी परिसरातील पेट्रोल पंपासमोर अज्ञातांकडून बिल्डरवर गोळीबार करण्यात आला. फ्रेडी दिलीमा असे गोळीबार झालेल्या बिल्डरचे नाव आहे.

बिल्डर कारमध्ये बसले असताना दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यांनी दोन ते तीन राउंड फायर केले. या हल्ल्यात फ्रेडी यांच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या. गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून फरार झाले. जखमी तरुणाला बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या कांदिवलीपश्चिमच्या चारकोप परिसरातील फादर सुसाई इंग्रजी शाळेजवळ बिल्डर हा गाडी पार्क करत होता. त्याचवेळी अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यांच्याकडून पंचनामा देखील करण्यात आला आहे. तसेच फॉरेन्सिक टीमकडून पुरावे देखील गोळा करण्यात आले. रुग्णालयात दाखल केलेल्या बिल्डरच्या पोटातून डॉक्टरांनी यशस्वीरित्या गोळ्या काढण्यात आल्या आहेत.

मुंबई शहरात नेमका गोळीबार कुठे झाला?

मुंबईच्या चारकोप परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ गोळीबार झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कर्तव्य पथकावर भारतीय लष्कराची ताकद पाहायला मिळणार

Chanakya Niti: कोणत्या गोष्टींचा जास्त मोह ठेवू नये? जाणून घ्या जीवनाचं कडू सत्य

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

SCROLL FOR NEXT