Arthur Road Jail Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Arthur Road Jail Crime News: कारागृहात कैद्यासोबत घडलं लाजिरवाणं कृत्य; आर्थररोड जेलमधील घृणास्पद घटना

Arthur Road Jail News: आरोपीने तक्रारदार कैद्याला कोठडीत मारहाण देखील केली आहे.

सुरज सावंत

Mumbai Central Prison: मुंबईच्या आर्थररोड कारागृहातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कैद्यावर अन्य दोन कैद्यांनी अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. जेलमध्ये कैद्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आर्थररोड कारागृहातील या धक्कादायक घटनेनं इतर कैद्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपी कैद्यांनी आर्थररोड कारागृहातील कैद्यावर अत्याचाराचा प्रयत्न करत त्याला धमकी देखील दिली आहे. ऐवढेच नाही तर आरोपीने तक्रारदार कैद्याला कोठडीत मारहाण देखील केली आहे.

बुधवारी रात्री हा प्रकार घडला असून रविवारी या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी समीर शब्बीर शेख उर्फ पुडी (२२), राशीद हसन फराज (३६) या दोघांवर ३७७,३२३, ५०४,५०६, ३४ भादवी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

कारागृहातून चौकशीला कोर्टात नेलेल्या आरोपीकडे आढळला गांजा

आर्थररोड कारागृहासह (Arthur Road Jail) अन्य कारागृहांमध्ये देखील असे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. काही दिवसांपूर्वी भंडारा कारागृहातून कोर्टात सादर केलेल्या कैद्याजवळ गांजा आढळल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. कोर्टातून कारागृहात परत आल्यावर झडती दरम्यान प्रवेशद्वारातील अंमलदाराला गांजा आढळल्याने वेळीच तो जप्त करत आरोपी कैद्याविरुद्ध भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी क्रमांक 146 श्याम उर्फ पी टी रमेश चाचेरे असे गुन्हा नोंद झालेल्या कैद्याचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death : खोलीत पेस्ट कंट्रोल केला, दारं-खिडक्या बंद; ट्रेनी पोलिसाचा गुदमरून मृत्यू, दिवाळीत दुर्दैवी घटना

Maharashtra Live News Update: पुण्यात पी एम पी बस चालकाकडून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Meghalaya Travel: पृथ्वीवरील स्वर्ग! वर्षभर पडतो पाऊस; हिरवळ, धबधबे आणि निसर्गसौंदर्याचे खजिना पाहून तुम्हीही व्हाल थक्क

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

SCROLL FOR NEXT