Aditya Thackeray Vajramuth Sabha Saam TV
मुंबई/पुणे

Vajramuth Sabha Mumbai : गुजरातकडे दोन मुख्यमंत्री, एक त्यांचे, दुसरे आपले; CM शिंदेंचं नाव न घेता आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Aditya Thackeray on Eknath Shinde : गुजरातकडे दोन मुख्यमंत्री, एक त्यांचे, दुसरे आपले; CM शिंदेंचं नाव न घेता आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Satish Kengar

Aditya Thackeray on Eknath Shinde : ''आज या घटनाबाह्य सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटतात का? योगायोग असा आहे, आज गुजरातकडे दोन मुख्यमंत्री आहेत. एक त्यांचे दुसरे आपले'', असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईत बीकेसी येथे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते असं म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''केंद्र सरकारकडे मी एक मागणी केली, गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य एकाच दिवशी गठीत झालेत. १ मे त्यांचा आणि आपलाही स्थापाना दिवस. जितक्या मी महाराष्ट्राला शुभेच्छा देत आहे, तितक्याच मी गुजरातलाही देत आहे. मात्र इथं कोणी ज्योतिषी असल्यास सांगावं, दोन्ही राज्याच्या कुंडलीत काय फरक आहे?'' केंद्र सरकारकडून गुजरातला पाठबळ मिळत आहे. मात्र तितकंच महाराष्ट्राला मिळत आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.  (Latest Marathi News)

Vajramuth Sabha Mumbai : 'सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच'

आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''राज्याच्या मंत्रिमंडळात घटाबाह्य सरकार बसलं आहे, आणि मी लिहून देतो की हे थोड्या दिवसाचा खेळ आहे, सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच.''

ते म्हणाले, ''या सरकारमध्ये एकतरी महिली, मुंबईचा अस्सल मुंबईकर दिसला आहे का? कदाचित कोणीतरी स्केअर फूट विकणारे असतील पण इंच इंच जाणणारे कोणी नाहीयेत असे आदित्य ठाकरे म्हणाले. ना मुंबईचा, ना पुण्याचा आवाज आहे. मंत्रीमंडळ पाहिलं तर हे बिल्डर आणि कंत्राटदारांचं सरकार झालं आहे''

Vajramuth Sabha Mumbai : 'शेतकऱ्यांचा आवाज ऐकणार कोणी या मंत्रिमंडळात नाहीये'

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ''महाविकास आघाडीच्या काळातजी कर्जमुक्ती झाली, कोविडच्या काळात अर्थचक्र बंद असताना देखील अनेक अपत्ती आल्या पण त्यावेळी साडे १४ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली. मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली पण शेतकऱ्यांचा आवाज ऐकणार कोणी या मंत्रिमंडळात नाहीये.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT